ताज्या बातम्या

गेवराईमध्ये भरपावसात संविधान बचाव रॅली संविधान जाळणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या

गेवराई (रिपोर्टर):- ‘संविधान के सन्मान में हम सब मैदान में,’ असे म्हणत गेवराईसह तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आज शहरामधून संविधान बचाव रॅली काढली होती. ही रॅली शिवाजी चौकातून निघाली होती. तहसील कार्यालयावर रॅली धडकल्यानंतर विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. रॅलीमध्ये संविधान जाळणार्‍या वृत्तीचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे काही मनुवृत्तीच्या लोकांनी संविधानाची प्रत जाळून देशवासियांचा अवमान केला. या घटनेचा निषेधार्थ सर्वत्र संताप व्यक्त होत असून संविधानाची प्रत जाळणार्‍या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आज गेवराईच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरामधून संविधान बचाव रॅली काढली. ही रॅली भरपावसात निघाली होती. शिवाजी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. शास्त्री चौक, मेन रोड, मिरवणूक मार्ग या रस्त्याने रॅली तहसील कार्यालयावर धडकली. संविधान के सन्मान में हम सब मैदान में, संविधान जाळणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या यासह इतर घोषणांनी शहर दणाणून गेले होते. तहसील कार्यालयासमोर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संविधानाची प्रत जाळणार्‍या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review