ताज्या बातम्या

ललित साळवेनंतर बीडमध्ये चिमुकलीवरही लिंगबदल शस्त्रक्रिया 

बीड (रिपोर्टर):- बीडमधील पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांच्याच गावातील एका पाच वर्षाच्या चिमुरडीवरही लिंबदलाची शस्त्रक्रिया होणार आहे. मुलगी म्हणून वाढवलेली आयमान मुलगा असल्याचे निष्पन्न झाल्याने हा ऑपरेशन करण्यात येणार आहे. 
माजलगावात मजुरी करणार्‍या सईद खान पठाण यांना २०१३ मध्ये मुलगी झाली. तिचं आयमान असं नाव ठेवण्यात आलं. आयमान जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिच्या शरीरात बदल होऊ लागले आणि तिला त्वचेचा त्रास होऊ लागला. घरच्या लोकांनी तिला बीडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या आणि ती मुलगी नसून मुलगा असल्याचे यात निष्पन्न झाले. या मुलीच्या शरीरामध्ये होणारा बदल, तिची वागणूक ही पुरुषासारखी असल्याचे तिच्या पालकांना जाणवले. त्यामुळे त्यांनी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. आयमानचं नाव बदलून अमन ठेवण्यात आले आहे. लवकरच तिच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पाच वर्षांची आयमान आता अमन म्हणून नव्याने आयुष्य सुरू करणार आहे. ललित साळवेंच्या शस्त्रक्रियेमुळे बीडच्या आजूबाजूच्या गावागावांमध्ये याबाबत जनजागृती झाली आहे. त्यामुळे अशा अवस्थेत जीवन जगणारे अनेक जण पुढे येऊन वैद्यकीय उपचार घेत आहेत. लिंगबदलाची प्रक्रिया किचकट असली तरी तिच्याविषयीची भीती आता कमी होताना दिसत आहे. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review