ताज्या बातम्या

आष्टीत ६ क्विंटल गोमांस पकडले; आरोपी अटकेत 

आष्टी (रिपोर्टर):- राज्यात गोहत्या बंदी कायदा अमलात असताना बेकायदेशीरपणे गोवंश हत्या केली जात असल्याची माहिती आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भुतेकर यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित कत्तलखान्यावर छापा मारला असता त्याठिकाणावरून तब्बल ६ क्विंटलपेक्षा जास्त मांस मिळून आलं. घटनास्थळावरून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करत आरोपी इफ्तेखार तय्यब कुरेशी विरुद्ध महाराष्ट्र गोहत्या बंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे. 
आष्टी तालुक्यातील खडकत याठिकाणी कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भुतेकर यांना मिळाली होती. त्यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदरील कत्तलखान्यावर छापा टाकला असता कत्तलखान्यात गोवंश हत्या करून त्याचे मांस अवैधरित्या विक्रीसाठी पाठवले जाणार होते. परंतु वेळीच पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारून तब्बल ६ क्विंटलपेक्षा जास्त रुपयांचे माल जप्त केले. सदरची कारवाई भुतेकर यांनी तेथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रजेवर गेल्यामुळेच करू शकले, अशी चर्चा आष्टीत होत आहे. त्यामुळे या कत्तलखान्यास आजपर्यंत पोलिसांचे अभय होते का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी कत्तलखान्यातून सहा क्विंटलपेक्षा जास्त मांसासह पत्र्याचे शेड असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक भुतेकर, पीएसआय गोडसे, पीएसआय शहाने, पोलिस नाईक गर्जे, गुजर यांनी करून आरोपी इफ्तीखार तय्यब कुरेशी यास ताब्यात घेऊन महाराष्ट्र गोहत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review