ताज्या बातम्या

दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या 

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील वाळुंज येथील रहिवाशी असलेल्या एका ३८ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल घडली असून याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  वाळुंज येथील अशोक विठ्ठल खाडे नामक शेतकर्‍याने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना २ सप्टेंबर रोजी घडली होती. सदर शेतकर्‍यास उपचार्थ आष्टी येथील दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा काल दि ३ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला.  नातेवाईकांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review