डुब्बाथडी शिवारात वाळू उपश्यावर डीवायएसपींची धाड

दहा टिप्पर घेतले ताब्यात; चौकशी सुरू

माजलगाव (रिपोर्टर):- रस्ते विकास महामंडळाने घेतलेल्या टेंडरची वाळू दुसरीकडेच जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी डीवायएसपी नौटक्के मॅडम यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी आज घटनास्थळी जावून ३० टिप्परपैकी १० टिप्पर ताब्यात घेतले. हे टिप्पर नेमके कोणाचे आहेत हे वाळू घेऊन कुठे चालले? या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. माजलगाव शिवारातील डुब्बाथडी परिसरातील वाळूचा ठेका रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे. दररोज अनेक टिप्पर याठिकाणाहून भरून जातात. मात्र ज्या संस्थेने हा ठेका घेतला त्याठिकाणी वाळू न जाता इतर ठिकाणी वाळू जात असल्याची तक्रार डीवायएसपी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता डीवायएसपी नौटक्के, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन धाड टाकली. त्याठिकाणी या अधिकार्‍यांना ३० टिप्पर आढळून आले. यापैकी १० टिप्पर ताब्यात घेऊन हे टिप्पर नेमके कोणाचे आहेत? आणि ते कुठे चालले ? याची चौकशी सुरू आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review