ताज्या बातम्या

तहसीलदारांनी बँक कर्मचार्‍यांना झापले; वयोवृद्धांच्या पगारी तात्काळ वाटप करा

बीड (रिपोर्टर):- निराधार श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पगार वाटप केला जात आहे. दररोज फक्त १५ ते २० जणांनाच पगार दिला जात असल्याने सर्व लाभार्थ्यांना पगार वाटपासाठी दहा ते पंधरा दिवस लागत असल्याने सर्वांना एकत्रितच पैशाचे वाटप करण्यात यावे अशा सूचना देत अनागोंदी कारभार करणार्‍या बँक कर्मचार्‍यांना तहसीलदारांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. बीड तालुक्यात निराधारांचे शेकडो लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना सहा महिन्यातून एकदा पगार वाटप केले जाते. सध्या तहसीलच्या पाठीमागे या लाभार्थ्यांना बँकेचे कर्मचारी पगार वाटप करतात. मात्र दररोज फक्त पंधरा ते वीस जणांनाच पगार मिळत असल्याने इतर लाभार्थी पगारीसाठी चकरा मारत असतात. सर्वांना एकाच दिवशी पगार वाटप करण्याच्या सूचना बीड तहसीलदारांनी संबंधित बँक कर्मचार्‍यांना दिल्या असून आपल्या कामात निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना तहसीलदारांनी चांगलेच झापले आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review