ताज्या बातम्या

पेट्रोलिंग करताना परळी पोलिसांनी १२ लाखांचा गुटखा पकडला

१५ दिवसात जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात

परळी / बीड (रिपोर्टर):- धर्मापुरी रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एका टेम्पोबाबत संशय आला असता या टेम्पोची झाडाझडती घेण्यात आली. टेम्पोत लाखो रुपयांचा गुटखा आढळून आल्याने गुटख्यासह टेम्पो ताब्यात घेऊन चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई परळी ग्रामीण पोलिसांनी केली असून टेम्पोत जवळपास १२ लाखा १४ हजाराचा गुटखा असल्याचे सांगण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हाभरात पोलिसांनी गुटख्यावर अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून दोषींविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. काल परळी ग्रामीण ठाण्याचे पोलिस कर्मचारी परळी-अहमदनगर रोडवरील धर्मापुरी शिवारात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी या रस्त्याने टेम्पो (क्र. ०४-१४४४) जात होता. या टेम्पोबाबत पोलिसांना संशय आल्याने टेम्पो थांबवून त्याची झाडाझडती घेण्यात आली. यात १२ लाख १४ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. टेम्पोमधील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पोसह गुटखा ग्रामीण पोलिसांनी जप्त करून याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविली होती. ही कारवाई परळी ग्रामीण ठाण्याचे पीएसआय आडे, हरेगावकर, सोटगीर यांनी केली.

अधिक माहिती: parali

Best Reader's Review