ताज्या बातम्या

सरकारविरोधात राष्ट्रवादीचे सोशल मीडियावर ‘जवाब दो’ आंदोलन

राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे का? - धनंजय मुंडे

बीड (रिपोर्टर):- राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल करत ५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्‍न या शिर्षकाखाली ‘जवाब दो’ आंदोलन सोशल नेटवर्किंग मीडियावर सुरू केलं असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आ. राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मुकसंमती आहे, असे समजावे का? असा सवाल विचारत जवाब दो एका ट्विटद्वारे म्हटले आहे. राज्यातली आणि देशातली परिस्थिती भयावह होत आहे. महागाईचा आगडोंब उसळत आहे. अशा स्थितीत राज्य आणि केंद्र सरकार मात्र आपल्याच तंदरीत आहे. या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोशल मीडियाद्वारे जवाब दो आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे शिर्षक ‘५६ इंचच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्‍न’ असे ठेवले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनात धनंजय मुंडेंच्या ट्विटरवर राज्यात पेट्रोल-डिझेलवरील अवास्तव वॅट रद्द होऊन दर आटोक्यात कधी येणार? हा प्रश्‍न विचारत जवाब मागितला आहे. ‘कितने लोगों के खाते मे १५ लाख रुपये आग गए मोदीजी?’ असाही प्रश्‍न विचारून जवाब मागितला आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी ट्विट केले आहे. त्यामध्ये आमदार राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे, असे समजावे का? असा जळजळीत सवाल विचारून जवाब मागितला आहे. राम कदम यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत संतापजन आहे. अखंड महाराष्ट्राला काळवंडून टाकणारे आणि स्त्री जातीला अपमानित करणारे असूनही भाजपाकडून अद्याप राम कदम यांच्याविरोधात कुठलीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे राज्यभरात संताप उफळलेला आहे. आज राष्ट्रवादीने सोशल मीडियावरून अशा प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे का? हा सवाल विचारून जवाब मागितला आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review