ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसांच्या मनमानीपणामुळे वाहनधारक वैतागले

बीड (रिपोर्टर):- शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असून सदरील हे वाहतूक कर्मचारी नियमानुसार कारवाई करण्याऐवजी कागदपत्र असतानाही पावत्या फाडण्याचा आग्रह धरत असल्याचे अनेक वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. नियमानुसार योग्य ती कारवाई करायलाच हवी, पण लायसेन्स, गाडीचे कागदपत्र असतानाही कारवाई होत असेल तर ही चुकीची बाब आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शिवाजी चौक, साठे चौकसह आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. नियमाचे पालन न करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. अशा कारवाया करायलाच हव्या. मात्र ज्या वाहनधारकाकडे गाडीचे कागदपत्र आहेत, लायसेन आहे, गाडीवर व्यवस्थीत नंबर आहे अशा वाहनधारकांनाही २०० रुपये दंड देणे योग्य आहे का? हे कुठल्या नियमात बसते? वाहतूक शाखेचे काही कर्मचारी विनाकारण वाहनधारकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review