ताज्या बातम्या

पत्रकार वसंत मुंडे यांना मातृशोक; लक्ष्मीबाई मुंडे यांचे दुःखद निधन

 परळी (रिपोर्टर):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा पत्रकार शासकीय अधिस्वीकृती समिती औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष दैनिक लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी वसंत मुंडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई महादेव मुंडे वय ६७ वर्ष रा लाडझरी ता परळी जि बीड यांचे आज दि ८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता दुःखद निधन झाले. लक्ष्मीबाई मुंडे या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या पायी दिंडीतून देव दर्शनाला गेल्या होत्या. दर्शनाहून परत आल्यानंतर त्या आजारी पडल्या. त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल येथे उपचार करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे ४ वाजता दुःखद निधन झाले .मृत्यू समयी त्या ६७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गावी लाडझरी येथे आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले ज्ञानेश्वर, वसंत आणि बालासाहेब, सुना नातू-पतवंडे असा मोठा परिवार आहे. मुंडे कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review