ताज्या बातम्या

मराठा आरक्षण नाही तोपर्यत कुप्प्यात राजकिय पुढार्‍यांना गावबंदी

ग्रा.पं.तीचा ठराव ;गांवकर्‍यांनी दिले प्रशासनाला निवेदन 

वडवणी (रिपोर्टर):-  मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, ठोक मोर्चा काढून प्रशासना समोर तळ ठोकून असे एक ना अनेक प्रकराची आंदोलने केली तरी पण भाजपा सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही म्हणुनच कुप्पा गांवातील समस्त मराठा समाजाने राजकिय पुढार्‍यांना गावबंदी केली आहे. याचे ङ्गलक आज गावच्या प्रवेश द्वारावर लावले आहे. तर काल तहसिल व पोलीस प्रशासनाला रितसर निवेदनही दिले आहे.
   मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज आग्रही आहे. अनेक आंदोलने केली तरी सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. म्हणुनच वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील जनावरांचे मोठे बाजारपेठ असणार गाव असून मराठा समाजाला जोपर्यत आरक्षण मिळत नाही तो पर्यत राजकिय पुढार्‍यांना कुप्पा गावात बंदी केली आहे. जरी गांवात राजकिय पुढारी आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर तोच पुढारी जबाबदारी राहिल अशा प्रकारचे निवेदन काल गावकर्‍यांच्या वतीने तहसिलदार व वडवणी पोलीस स्टेशनला लेखी दिले आहे. याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीने दि.१७ ऑगस्ट रोजीच घेतला आहे. तर आज सकाळी गांवातील तरुणांनी गांव प्रवेशाच्या ठिकाणी जाहिर निषेधाचं फलक सुध्दा लावलं आहे. यावेळी उपसरपंच बाबासाहेब भारस्कळ, दशरत सावंण, प्रकाश सावंत. डॉ. प्रवीण सावंत, शामसुंदर सावंत, बाळासाहेब सावंत, गणु बापु सावंत, अजय सावंत, महेशराव  सावंत, बंडु आबा सावंत, वसंत वडचकर, रंजित सावंत, हनुमान काळे, हनुमान सावंत, अक्षय सावंत,सुशिल सावंत, दादासाहेब सावंत, सचिनमायराने, जगन्नाथ सावंत.राहुल सावंत,राजेश सावंत,सुमित सावंत, दत्ता कदम, संजय सावंत,योगेश सावंत सह आदि जण उपस्थित होते.

फलकावर हे आहेत उद्गार
त्या फलकावर जाहिर निषेध म्हणून लिहिले आहे. त्याखाली चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण आमचे लक्ष,मराठा आरक्षण जो पर्यत मिळत नाही तो पर्यत राजकिय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही,गावात आल्यास जिवित्वाची जबाबदारी स्वत; त्यांची राहिल ....समस्त गांवकरी मंडळी कुप्पा,ता.वडवणी जि.बीड असे फलकावर लिहून काढले असुन आज या ङ्गलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review