ताज्या बातम्या

मारहाण करून महिलेचे मंगळसूत्र पळविले

चार दिवसानंतर महिला आली शुद्धीवर

बीड (रिपोर्टर):- ‘तुम्हाला काम देतो म्हणून,’ कारंजाहून एका महिलेस मोटारसायकलवर नेऊन शाहूनगर परिसरात तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून नेल्याची घटना मंगळवारी घडली होती. मारहाणीमुळे महिला बेशुद्ध झाली होती. आज तिला शुद्ध आली असून सदरील ही महिला आम्ला येथील असल्याचे सांगण्यात आले. मैनाबाई ज्ञानोबा सोळंके (वय ५३) ही महिला मजुरीनिमित्त बीड येथे येत असे. मंगळवारी कामानिमित्त महिला कारंजावर थांबली होती. त्याठिकाणी एक तरुण मोटारसायकलवर आला, तुम्हाल काम देतो म्हणून महिलेस मोटारसायकलवर बसवून शाहूनगर परिसरात आणले. त्याठिकाणी एका बांधकामाजवळ महिलेला दगडाने मारहाण करून तिच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र पळवून नेले. जखमी अवस्थेत महिला घटनास्थळी पडली होती. तिला तेथील काही नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. चार दिवसांपासून महिला शुद्धीवर नव्हती. आज तिला शुद्ध आली असून तिने घडलेल्या घटनेची माहिती सांगितली . या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review