ताज्या बातम्या

सावकाराच्या जाचास कंटाळून  शेतकर्‍याची आत्महत्या 


जाधववाडीत शेतकर्‍याचा मृतदेह विहिरीत आढळला
नेकनूर/बीड (रिपोर्टर):- सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ३५ वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी चाकरवाडी येथे घडली तर जाधववाडी येथील एका ५० वर्षीय शेतकर्‍याचा मृतदेह विहीरीमध्ये आढळून आला. 
केशव रघुनाथ चौरे (वय ३५, रा. चाकरवाडी) या शेतकर्‍याकडे काही सावकारांचे पैसे देणे होते, पैशासाठी सावकार तगादा लावत असल्याने त्यांनी आज सकाळी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये   सावकाराच्या नावाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली. पोलिस निरीक्षक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख बासेद, जमादार काळे हे अधिक तपास करत आहेत. दुसरी घटना तालुक्यातील जाधववाडी येथे घडली. बेलू जाणू जाधव (वय ५०) हा शेतकरी नारळ फोडण्यासाठी विहीरीवर गेला होता. पाय घसरून तो विहीरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review