ताज्या बातम्या

पेट्रोल-डिसेल दरवाढ मागे अन्यथा खुर्च्या खाली करा


वडवणीतील समविचारी पक्षाचा कडकडीत बंद
वडवणी (रिपोर्टर):- भाजपा सरकार हे उद्योजकाच भलं आणि सर्वसामान्यांची राख लावणार आहे.पेट्रोल-डिसेल इंधनाचे दरवाढ रोजच होत आहे.यामुळे सर्वसामान्याचे कमरडे मोडले आहे.हि दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा भाजपा सरकारने खुर्च्या खाली कराव्यात, मोदी सरकार झुठी है,देश कि जनता भुखी है अश्या घोषणा देत वडवणीच्या समविचारी असणार्‌या पक्षानी एकञ येत शहरात रँली काढून बाजारपेठ कडाकडीत बंद ठेवण्यात आली आहे.
काल राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने पेट्रोल-डिसेल दरवाढी बाबत भारत बंदाची हाक देण्यात आली होती आणि आज याल सर्मथन देण्यासाठी  सकाळी वडवणी तालुक्यातील कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,मनसे,शेकापा,एसएफआय,ड.गौत्तम भालेराव मिञ मंडळ,समता परिषेद,मानवी हक्क आभियान यासह आदि समविचारी पक्षाच्या कार्यकर्ते आंबेडकर चौक येथे एकञ आले.तेथुन चिंचवण रोड वरील चाटे चौक,आंबेडकर चौक,नाईक चौक,संविधान चौक,छञपती शिवाजी महाराज चौक मार्गे बीड रोड आणि तेलगांव रोड याठिकाणी रँली काढून वाजत गाजत बंदाची हाक देण्यात आली यात पेट्रोल-डिसेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा भाजपा सरकारने खुर्च्या खाली कराव्यात, मोदी सरकार झुठी है,देश कि जनता भुखी है...पेट्रोल-डिसेलची दरवाढ मागे घ्या अन्यथा भाजप सरकार खुर्ची खाली करा...भाजपा सरकार हाय...हाय....अशा एकना अनेक सरकार विरुध्दात घोषणा देण्यात आल्या तर यावेळी शहरातील व्यापारी बांधवानी सक्रीय भाग घेत स्वताचे दुकान बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला यावेळी सर्वच समविचारी पक्षाचे व समाजिक नेते गण सह आदि सर्वच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तर एक दंगल नियंञण पथकासह वडवणी पोलीसचा यादरम्यान मोठा बंदोबस्त पाहवयास मिळाला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review