ताज्या बातम्या

गेवराईत बंदला उत्ङ्गुर्द प्रतिसाद ; कॉंग्रेससह मनसे रस्त्यावर

गेवराईत बंदला उत्ङ्गुर्द प्रतिसाद ; कॉंग्रेससह मनसे रस्त्यावर

गेवराई ( रिपोर्टर) पेट्रोल,डिझेलसह घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती यासह दरवाढीच्या निषेधार्थ आज सर्वत्र कॉग्रेससह सर्वपक्षीय बंदला गेवराईत उत्ङ्गुर्द प्रतिसाद लाभला.
  दरम्यान सर्वपक्षीय असलेल्या या बंद मध्ये बंदमध्ये कॉंग्रेससह मनसे कार्यकर्तेच रस्त्यावर उतरले होते.  मात्र राष्ट्रवादीच्या वतीने एकही स्थानिकचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते दिसून आले नाही.  यावेळी यात सहभागी कॉंगेस व मनसेसह सहभागी असलेल्या विविध संगटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शहरभर रॅली काढून बंदचे आवाहन करत प्रशासनाला निवेदन दिले.  यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश हात्ते,कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके,कृष्णा राठोड,गणेश पवार,उमेश चव्हाण,किरण अजबकर,माऊली गाडे,जिजा शिंदे,मेघराज बेदरे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनच्याकडे निवेदन देऊन घोषनाबाजी करत निषेध नोंदवला. दरम्यान आजच्या बंद ला गेवराईत उत्ङ्गुर्द प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.महसूलच्या वतीने निवेदन स्वीकारण्यास विलंब आंदोलनकर्ते संतप्त ; अखेर पोलीस निरीक्षक अहेरांनीच स्वीकारले निवेदन

पेट्रोल दिसेल व गॅस च्या दरवाढीच्या निषेधार्थ करण्यात असलेल्या आंदोलनात गेवराईत बंदला उत्ङ्गुर्द प्रतिसाद लाभला.दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शहरभर रॅली काढत निषेधाचे निवेदन देण्यासाठी गेले असता या ठिकाणी महसुलचा एकही अधिकारी नसल्याने आंदोनलकर्ते संतप्त झाले होते यामुळे  पोलिसांचीही दमछाक झाली होती.अखेर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनीच पुढाकार घेत निवेदन स्वीकारून आंदोलन कर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review