ताज्या बातम्या

भारत बंदमध्ये जिल्ह्याचा उत्स्फूर्त सहभाग


परळी, गेवराईत कडकडीत बंद; माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी, धारूर, आष्टी, पाटोदा, शिरूर उत्स्फूर्त बंद, बीडमध्ये संमिश्र प्रतिसाद 
बीड (रिपोर्टर):- केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर कॉंग्रेससह राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य पक्ष-संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये बीड जिल्ह्याने उत्स्फूर्त सहभाग घेतला. बीड शहरासह गेवराई, परळी, माजलगाव, धारूर, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, अंबाजोगाई, केजमध्ये बंद पाळण्यात आला. परळी, गेवराईत कडकडीत बंद दिसून आला तर बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने अन्य पक्षांना सोबत घेऊन भारत बंदची हाक दिली आहे. बीडमध्ये कॉंग्रेससह राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य पक्ष-संघटनांनी रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन केले. सकाळी वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकार्‍यांची रॅली शहरातून निघाली. यामध्ये दादासाहेब मुंडे, प्रशांत पवार, अशोक तावरे, वैभव काकडे, श्रीराम बादाडे, शैलेष जाधव, भाई दत्ता प्रभाळे, भाई बाळासाहेब घुमरे, भाई राजेंद्र घुमरे, दिग्विजय दळवी, ज्योतीराम हुरकुडे, भारत प्रभाळे, दत्ता शिनगारे, अशोक येडे, शेख सिराज, प्रा. काळे, ऍड. पंडित कृष्णा, ऍड. औटे, महादेव धांडे, महादेव हिंदोळे, डॉ. मोटे, डॉ. हाशमी, राहुल साळवे, फरीद देशमुख, काकासाहेब सोनवणे, शामसुंदर जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी होते. 

परळी शहर कडकडीत बंद
परळी : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर या बंदमध्ये परळीकरांनी शंभर टक्के सहभाग नोंदवला. सर्व व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. कॉंग्रेस पक्षासह इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरामधून रॅली काढली होती. 
गेल्या तीन वर्षांमध्ये इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रातील भाजप सरकारने जे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले होते ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत? असा प्रश्‍न उपस्थित करत शासनाच्या निषेधार्थ आज बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने आपआपले व्यवहार बंद ठेवले  होते. टी.पी.मुंडेंसह आदी कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढली होती. 

केजमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; तहसीलवर काढली रॅली
केज : भारत बंदमध्ये केजकरांचा बंदमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर रॅली काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. 
शहरातील विविध भागातील व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवून आजच्या बंदमध्ये सहभाग नोंदवला. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून सकाळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर रॅली काढली. यामध्ये नंदकिशोर मुंदडा, आदित्य पाटील, पशूपतिनाथ दांगट, राहुल सोनवणे, मौला सौदागर, मोहन गुंड, सुमंत धस, सुनिल घोळवे, महादेव सूर्यवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 


 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review