ताज्या बातम्या

बॅनर लावण्यावरून केजमध्ये दोन गटात हाणामार्‍या

बॅनर लावण्यावरून केजमध्ये दोन गटात हाणामार्‍या
७ ते ८ जण जखमी; नगर पालिकेच्या निष्क्रीयपणामुळे घडली घटना
केज (रिपोर्टर):- शहरामध्ये विना परवाना बॅनर लावणार्‍यांची संख्या वाढली असून याकडे नगर पालिका लक्ष देत नाही. रात्री मंगळवार पेठ भागात गणेश मंडळाचे बॅनर लावण्यावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकावर हल्ला चढवल्याने यात ७ ते ८ जण जखमी झाले. पोलिसांनी काही तरूणांना ताब्यात घेतले. 
शहरांतर्गत बॅनर लावण्यासाठी नगर पालिकेचे परवानगी घेणे आवश्यक असते. केज नगर पालिका आपल्या निष्क्रीय कारभारामुळे नेहमीच ओळखली जाते. शहरात कुठे बॅनर लावले जातात? याला परवानगी असती का? हे पाहण्याचं काम नगर पालिकेचे असते. मात्र नगर पालिकेला घेणं ना देनं? या प्रमाणे न.प.चा कारभार सुरू आहे. मंगळवार पेठ कॉर्नरवर गणेश मंडळाच्या बॅनरवरून दोन गटात वादावादी झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने यात ७ ते ८ जण जखमी झाले. पोलिसांनी काही तरूणांना ताब्यात घेतले आहे. शहरातील बॅनर लावण्याबाबत नगर पालिका ठोस भूमिका घेत नसल्याने अशा हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review