ताज्या बातम्या

धार्मीक स्थळे हे संस्कार आणि संस्कृतीची शक्ती केंद्रे- आ.जयदत्त क्षीरसागर

पापनेश्‍वर मंदीरात आ.जयदत्त क्षीरसागरांच्या हस्ते महाआरती

बीड  - शहराला धार्मीकतेचा वारसा लाभला असून सर्व धर्मीय येथे श्रध्दा आणि भक्तीने आपआपली उपासणा करीत भाईचारा राखण्यासाठी सदैव प्रयत्न करतात ही कौतूकास्पद बाब असून धार्मीक स्थळे हे संस्कार आणि संस्कृतीला बळकटी देण्याबरोबरच मानवी मनाला नव उर्जा देण्याचे कार्य करीत असतात त्यामुळे येथे मीपणा नाहीसा होवून नम्रभाव वाढीस लागत असतो म्हणून संस्कार आणि संस्कृतीची शक्ती केंद्रे असल्याचे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले. सोमवार दि.१० सप्टेंबर रोजी श्रावण महिना समाप्तीनिमित्त शहराचे प्राचिन आणि पौराणिक वारसा लाभलेल्या पापनेश्‍वर महादेव मंदिरात आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती व सामुदायीक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात आ.क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर विलास बडगे, दिनकर कदम, आसाराम गायकवाड, अशोक जाधव, अरूण गोरे, बंडू ढेपे, दिलीप वांगीकर, प्रकाश कानगांवकर महेश मिटकरी, अशोक शेटे, नवनाथ गोरे, शिवाजी गोरे, संदीप शेळगांवकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आ.क्षीरसागर म्हणाले की शहरातील हेमाडपंथी प्राचिन वारसा लाभलेल्या आणि भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पापनेश्‍वर महादेव मंदिरात सामाजिक, धार्मीक कार्यक्रमासाठी सांस्कृतीक सभागृहाची आवश्यकता असून मंदिराच्या सर्वागिण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील असे ते यावेळी म्हणाले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने आ.जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला, पुरूष भाविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review