चारित्र्याच्या संशयावरून महिलेस पेटवले

 आरोपी पतीस पोलिसांनी जेरबंद केले

बीड (रिपोर्टर):- चारित्र्यावर संशय घेवून एका ३० वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे घडली असून महिलेस उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील आरोपी पतीस माजलगाव पोलिसांनी अटक केली. शेख शाहिन फेरोज (वय ३०) या महिलेच्या चारित्र्यावर तिचा पती शेख फेरोज युसूफ (वय ३८) नेहमी संशय घेत असे या संशयातून ३ सप्टेंबर रोजी आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात ती गंभीररित्या भाजल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी महिलेचा जवाब घेवून आरोपी शेख फेरोज याच्या विरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review