अपंग तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

रंजेगाव शिवारात घडली घटना
बीड (रिपोर्टर):- अपंग असलेल्या ३२ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सिंदफना नदीच्या काठी रंजेगाव शिवारात घडली. सदरील तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रविंद्र विष्णू पांडुळे याने सिंदफना नदी काठी असलेल्या एका चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील हा प्रकार काही लोकांना निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पिंपळनेर पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. विष्णू किसन पांडुळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review