ताज्या बातम्या

बेपत्ता वृद्धाचा विहीरीत मृतदेह आढळला

ढेकणमोहा येथील घटना 
बीड (रिपोर्टर):- बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय वृद्धाचा विहीरीमध्ये मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी ढेकणमोहा येथे उघडकीस आली. या घटनेची माहिती संबंधित ठाण्याच्या पोलिसांना कळविण्यात आली होती.  
 विठ्ठल देवराव भोगे (वय ७५) हे ३ सप्टेंबरपासून गायब होते. याबाबत गायब झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दहा दिवसानंतर त्यांचा मृतदेह विहीरीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review