ताज्या बातम्या

मंडपमुळे दुकानांना अडथळा व्यापार्‍यांची पोलिसात धाव

बीड (रिपोर्टर):- शहर पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर मंडप लावल्याने यामुळे येथील व्यापार्‍यांना याचा त्रास होत असल्याने काही व्यापार्‍यांनी शहर पोलिसांकडे धाव घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. यानिमित्ताने सुभाष रोडवरील रस्त्यावर मंडप टाकण्यात आला.
 या मंडपमुळे सदरील भागातील दुकानदारांना याचा त्रास होऊ लागला. त्यांना दुकान उघडण्यास व्यापार करण्यास त्रास होत असल्याने काही व्यापार्‍यांनी आज सकाळी शहर पोलिसांकडे धाव घेऊन पोलिस निरीक्षकांकडे आपली कैफियत मांडली होती. गेल्या वर्षी याठिकाणी मंडप टाकण्यात आला नव्हता मात्र या वेळी टाकण्यात आला असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review