ताज्या बातम्या

शोकाकुल वातावरणात वैभव (मुन्ना) डावकर यांच्यावर अंत्यसंस्कार 

बीड (रिपोर्टर):- अजिजपुरा भागातील वैभव ऊर्फ मुन्ना डावकर यांचे रात्री अपघाती निधन झाल्याने आज सकाळी शहरातील भगवानबाबा स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
वैभव वसंतराव डावकर ऊर्फ मुन्नाशेठ हे काल रात्री पुणेहून बीडकडे येत होते. निरगुडीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने यामध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४५ वर्षे होते. मुन्नाशेठ हे आपल्या मनमिळावू स्वाभावामुळे बीड शहरात सर्वचीत  होते. त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी भगवानबाबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, नागरीक, व्यापारी, पत्रकार, वकील सह आदींची उपस्थिती होती. डावकर कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review