ताज्या बातम्या

राफेल हि मोदींची सर्वात मोठी चोरी - आ बसवराज पाटील

 विमान खरेदी घोटाळ्याची तात्काळ चौकशी

करावी काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड(रिपोर्टर):- राफेल युद्धविमान खरेदीत घोटाळा झाल्याचे कागदोपत्री पुरावे असताना चौकशीला सामोरे जाण्यास भाजप तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेल मुद्द्यावरून पळ काढत आहेत. राफेल विमान खरेदीत तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या भाजप सरकारने पाय उतार व्हावे, या प्रश्नी लोकजागृती व जनजागृती निर्माण करण्यासाठी बीड येथे आज काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी या निदर्शनास आलेल्या आ बसवराज पाटील यांनी राफेल युद्ध विमान खरेदी हि मोदींची सर्वात मोठी चोरी असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसच्या सत्ताकाळात या विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये होती. ती विद्यमान पंतप्रधान मोदींनी १० एप्रिल २०१५ ला अचानक फ्रांस दौरा करत ती १६७० कोटी रुपये कशी काय केली म्हणत त्यांनी ४१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा राफेल विमान खरेदीत केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या विमान खरेदीत राज्य शासनानदेखील मिहानमध्ये घाईघाईत जमीन देत घोटाळ्यात भागीदार बनलेले असल्याचा आरोप यावेळी आ बसवराज पाटील यांनी करत सदर प्रकरणाची चौकशी व्हावी असे म्हंटले आहे. आज दुपारी १ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसचे जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते या निदर्शनास उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री आ बसवराज पाटील, भीमराव डोंगरे, माजीमंत्री प्रा सुरेश नवले, राजकिशोर मोदी, दादासाहेब मुंडे, प्रा सर्जेराव काळे, सत्संग मुंडे, डॉ इद्रिस हाश्मी, सिराजभाई देशमुख, ऍड राहुल साळवे, नागेश मिटे, महादेव धांडे, ऍड कृष्णा पंडित आदींसह काँग्रेस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची या निदर्शनास लक्षणीय संख्येनी उपस्थिती होती.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review