राष्ट्रवादी म्हणजे ‘अलिबाबा चालीस चोर’ची टोळी


कृषी प्रदर्शनात सदाभाऊ खोतांचा विरोधकांवर  हल्ला 
गेवराई (रिपोर्टर):- सत्तेच्या तुकड्यासाठी कोणाविरोधात लढलो नाही तर फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठी आपण लढत असून शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आजपर्यंत आम्ही राजकारण करत आलो आहोत. सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी विविध योजना आजपर्यंत राबवण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत मागच्या पंधरा वर्षात विरोधकांनी शेतीसाठी काय केले, असा जाब विचारत ना. सदाभाऊ खोत यांनी टीका व आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यात राष्ट्रवादी म्हणजे ‘अलीबाबा चालीस चोर’ची टोळी असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. 
ते गेवराई येथील अकरा वर्षांपासून सुरु असलेल्या किसान कृषि विकास प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खा. प्रीतम मुंडे, आ. लक्ष्मण पवार, रयत शेतकरी संघटनेचे ाहुल मोरे,कृषिभूषण सीताताई मोहिते, प्रकाशराव सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, शेख जमादार, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे,ऍड. खाडे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या मागील पंधरा वर्षाच्या काळात शेतकर्‍यांसाठी कुठल्या पायाभूत सुविधा व जागतिक बाजारपेठे मिळवून दिल्या ते सांगावे. भाजप सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असून सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविल्या. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव, पिकविमा, ३२ लाखाच्या वर शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ, वंचित शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत शेतकर्‍यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळावे यासाठी महिला बचत गट व विविध कंपन्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावे यासठी प्रयत्न करत आहे. टीका व आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. मागच्या पंधरा वर्षात विरोधकांनी सहकारी संस्था मोडीत काढल्याचा आरोप करत शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही राजकारण करत आलो आहोत, सत्तेच्या तुकड्यासाठी आम्ही कुणाच्या विरोधात लढलो नाही तर शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे ‘अलिबाबा चालीस चोर’ची टोळी असल्याचे सांगत गेल्या पंधरा वर्षात शेतकर्‍यांसाठी कुठल्या पायाभूत सुविधा व जागतिक बाजारपेठ विरोधकांनी उपलब्ध करून दिले ते आधी सांगावे. भाजपाच्या सोबत राहून तळागाळातील शेतकर्‍यांसाठी उपाययोजना राबवत आहे, असेही ते या वेळी म्हणाले. 


भाजप सरकारला शेतकर्‍यांची जाणीव -खा.मुंडे
भाजपा सरकारनेा शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवार योजना आणली. ती यशस्वी करून दाखविली, मागेल त्याला शेततळे दिले, माफक दरात खत, बि-बीयाणे व पीक विमा उपलब्ध करून दिला. या योजना प्रत्यक्षात अमलात आणल्या. सरकारला शेतकर्‍यांची जाणीव असून आजपर्यंत फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी भरीव मदत देण्याचे कार्य केले. दुष्काळी स्थितीमध्ये शेतकर्‍यांनी धीर सोडू नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असेही खा. प्रितम मुंडे यांनी म्हटले.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review