केंद्रीय दुष्काळ पाणी पथकाला राजेंद्र मस्के  निवेदन देऊन शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या

केंद्रीय दुष्काळ पाणी पथकाला राजेंद्र मस्के 
निवेदन देऊन शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ पथक आज सहा डिसेंबर रोजी बीड जिल्हा दुष्काळ दौर्‍यावर आले होते या पथकांमध्ये निती आयोगाचे सह सल्लागार मनीष चौधरी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस  सी शर्मा ग्रामीण विकास विभागाचे एस एन मिश्रा यांच्यासमवेत कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर व बीडचे जिल्हाधिकारी एमडी देवेंद्र सिंह यांचा समावेश होता सायंकाळी साडेपाच वाजता जरुड ता बीड येथील शेतामध्ये जाऊन दुष्काळी पाहणी पथकासमोर स्थानिक शेतकर्‍यांनी आपले शेतीमध्ये झालेले नुकसान पाणीटंचाई चार्‍याचा प्रश्न कर्जबाजारीपणा आदी परिस्थितीवर आपले म्हणणे पथकासमोर मांडले यावेळी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पथक प्रमुख मनीष चौधरी एस सी शर्मा मिश्रा यांना बीड जिल्ह्यातील दुष्काळाबाबत चर्चा करून शेतकरी जनावरे पाणीटंचाई चाराटंचाई याबाबत म्हणणे मांडून पोटतिडकीने जिल्ह्यातील दुष्काळावर तात्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देऊन त्यामध्ये जिल्ह्यात चारा व पाणी टंचाई गंभीर असल्यामुळे त्याबाबत तात्काळ उपाययोजना शेतकरी उसाचा चारा मिळतो पर करीत असल्यामुळे हाऊस चारा शिल्लक रहावा म्हणून जिल्ह्यातील कारखाने प्रशासनाने बंद करावेत जिल्ह्यातील आठ लाख २७ हजार पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करावी केंद्र सरकारने ल्ह्यिासाठी दुष्काळी मदत वा अनुदान तात्काळ मंजूर करून खरीप पिकाचे व रब्बी पिकांचे हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे जिल्ह्यात जलयुक्त शिवार बांधबंदिस्ती माती नाला बांध पाझर तलाव दुरुस्ती शेततळे आधी दुष्काळी कामे धडक व मनरेगा योजनेतून सुरु करून मजुरांना काम द्यावेत पाणी टँकर कसल्याही एनओसी शिवाय तहसीलदारांना मंजूर करावेत या मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी शेतकरी शिष्टमंडळात राजेंद्र मस्के शिवसेना युवा नेते गणेश उगले ,शेतकरी प्रतिनिधी उद्धव काकडे, जीवनराव बजगुडे, सखाराम शिंदे, इमरान पटेल, पंजाब काकडे सह राजेंद्र मस्के मित्रमंडळाचे बद्रीनाथ जटाळ, आंबेसावळी सरपंच प्रदीप गुंदेकर, महेश सावंत, छावा जिल्हाप्रमुख युवराज मस्के, बंडू मस्के, भीमा मस्के, अनिल शेळके , फळके आदी उपस्थित होते.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review