कबाडगल्लीमध्ये युवकाच्या दोन गटात वाद


चार मोटरसायकली फोडल्या
बीड (रिपोर्टर):- शहरातील कबाडगल्ली भागामध्ये युवकाच्या दोन गटामध्ये वाद निर्माण झाल्याने यात युवकांनी चार मोटरसायकली फोडून नुकसान केले. या वादावरून गल्लीमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली होती. सदरील हा वाद कुठल्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही. 
कबाडगल्लीतील काही युवक व बाहेरील काही युवकात वाद निर्माण झाला. या वादातून दोन गट आमने-सामने आल्याने यात दगडफेक करण्यात आली. यात चार मोटरसायकलचे नुकसान करण्यात आले. दगडफेकीची घटना घडल्याने एकच धावपळ उडाली होती. सदरील वादाचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती झाल्यानंतर शहर ठाण्याचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले होते.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review