भाविकांच्या गाडीचा स्फोट; सहा जखमी


बीड बायपासरोडवर आज पहाटे घडली घटना
बीड (रिपोर्टर):- शिर्डीला देवदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या मारोती १०० या गाडीच्या इंजिनचा आज पहाटे स्फोट झाला. यामध्ये सहा भाविक जखमी झाले. ही घटना बीड बायपास रोडवर घडली. या भाविकांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
विशाखापट्टणम येथील भाविक शिर्डीसाठी मारोती १०० क्रं. ए.पी.३३-२२४७ यामध्ये जात होते. पहाटेच्या दरम्यान बीड बायपासरोडवर गाडीच्या इंजिनचा स्फोट झाल्याने यामध्ये आर.सिताराम मुथ्थी, आर.लक्ष्मी, पी.रत्नमण, डी.राजमण व अन्य दोघे असे सहा जण जखमी झाले. या जखमींना १०८ या ऍम्ब्युलन्सने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review