दारू सोडविण्याचे औषध पिल्याने दोघा सख्या भावांचा मृत्यू

दारू सोडविण्याचे औषध पिल्याने दोघा सख्या भावांचा मृत्यू
परळी (रिपोर्टर):- दारूचे व्यसन सोडण्याचा प्रयत्न परळी तालुक्यातील तळेगाव येथील दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव शहरातील एका भोंदू डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आणलेल्या दोन सख्या भावांना दारू सोडवण्याच्या औषधामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
संजय ज्ञानदेव मुंडे (वय ४०) व विजय ज्ञानदेव मुंडे (वय ३५) रा. तळेगांव ता. परळी वैजनाथ जि. बीड हे दोन सख्खे भाऊ हदगांव येथील रविंद्र पोधाडे या घरगुती उपचार करणार्‍या व्यक्तीकडे दारू सोडवण्यासाठी गेले होते. त्यांना पोधाडे याने औषधी द्रव्य दिले. ते औषध घेवून ते व सोबतचे लोक परतीच्या प्रवासाला लागले. अंदाजे ३० किलोमिटर जाताच पोटात आग होते व जीव कासाविस करतो असे संजय मुंडे म्हणाले. त्यास पिण्याचे पाणी दिले. नंतर तो झोपला. त्याला नांदेडला पोहचल्यावर ऊठवण्याचा प्रयत्न केला असता तो ऊठत नसल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मृत्यू पावल्याचे सांगीतले. तेथुन पुढे तसेच ते गावाकडे निघाले. आणखी पन्नास किलोमिटर गेल्यावर दुसरा रुग्ण विजय मुंडे याला सुद्धा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला लोहा येथील ऊपजिल्हा रुग्णालयात नेले असता तो सुद्धा मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. नांदेड येथून माहीती कळाल्यानंतर गावाकडील नातेवाईकांनी धाव घेत लोहा गाठले. त्यानी भ्रमणध्वणीद्वारे हदगांव पोलीस ठाण्यात माहीती सांगीतली व दोन्ही प्रेत घेवून हदगांव पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी रविंद्र पोधाडे याच्या विरोधात भादवीचे कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review