बनावट रिव्हॉल्व्हरने मुलींना धमकावले?


अंबाजोगाई (रिपोर्टर):- अंबाजोगाई येथील चौसालकर कौलनी परिसरात असलेल्या खाजगी ट्युशन समोर दोन मुलांनी मुलींना बनावट रिव्हॉल्व्हर ने धमकविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या बाबत ना शिकवणी चालक ना मुलींच्या पालकांनी पोलीस प्रशासना कडे तक्रार दाखल केली नसून मात्र सदरील घटना खरी आहे किंवा खोटी या बाबत तपास सुरू केला आहे.    
या बाबत अधिक माहिती अशी की येथील चोसाळकर कॉलनीत काल दुपारी मुला मुलींचे ट्युशन चे खाजगी क्लास सुरू होते मात्र ट्युशन सुटल्यावर मुली घरा कडे येत असताना दोन मुलांनी बनावट रिव्हॉल्व्हर द्वारे  धमकविण्याचा प्रकार घडला. या बाबत ची चर्चा तात्काळ अनेकांना माहीत झाली मात्र सदरील प्रकार त्यामुलांनी जोक म्हणून केला की सत्य केले म्हणून आघ्यापही समजले नसून  या प्रकरणी ट्युशन चालकांनी तसेच मुलींच्या पालकांनी पोलीस प्रशासना कडे तक्रार दाखल केली नाही मात्र शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक देवकन्न्या मेंदाड ह्या पुढील तपास करत असून त्यांच्या तपासातून सदरील घटना खरी किंवा खोटी या बाबत माहिती प्राप्त होईल येथील ट्युशन चालक मात्र मुला मुलींची सुरक्षिकता वार्‍या वर सोडून भरमसाठ पैसा कमविण्यात मग्न आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review