पत्रकार बबन पगारे यांचे  निधन


आष्टी (रिपोर्टर):- आष्टी येथील पत्रकार बबन पगारे यांचे सोमवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी दोन वाजता त्यांच्या राहत्या गावी वाहिरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.  या बातमीने जिल्हाभरातील पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपला विश्‍वास निर्माण करणारे  तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बबन पगारे हे रविवारी विवाहच्या कार्यक्रमात दिवसभर व्यवस्त होते. रात्री घरी गेल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले. पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना पत्रकारांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून त्यांनी मोठे जाळे निर्माण केले. जिल्हाभरात त्यांनी आपले मित्र निर्माण केले. दुसर्‍याच्या सुख-दु:खात सहभागी होणार्‍या बबन पगारे यांनी स्वत:चे दु:ख मात्र इतरांना सांगितले नाही. दडपण आल्याने त्यांना रात्री त्रास सुरु झाला आणि यातच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. एक चांगला मित्र हरवल्याने जिल्हाभरात पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बबन पगारे यांची अचानक एक्झिट पत्रकारांना वेदना देणारी ठरली. आज त्यांच्यावर दुपारी दोन वाजता त्यांच्या राहत्या गावी वाहिरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातून पत्रकार वाहिरा गावाकडे रवाना होत आहेत. पगारे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review