टावरच्या बॅटर्‍या चोरणारांच्या आवळल्या मुसक्या


स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
बीड (रिपोर्टर):- मोबाईल टावरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी आवळ्या आवळल्या. ही कार्यवाही अधिक्षक जी. श्रीधर, उप्पर अधिक्षक वैभव कलुबर्मे, पी.आय. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल धस यांनी केली.
युसुब वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थनिक गुन्हे शाखेचे एपीआय अमोल धस यांना शनिवारी टावरच्या बॅटर्‍या चोरट्यांची टोळी असल्याची माहिती मिळताच त्यांनी युसुबवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत जावून आरोपी सुनिल भगवान नेहरकर (वय २२ वर्षे, रा. धारुर) व काकासाहेब हरिचंद्र हंडिबाग(वय ३२ वर्षे रा. अंबाजोगाई) यांच्या मुसक्या अवाळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी २०१८ मध्ये धारुन तालुक्यातील मैदवाडी व युसुबवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पळसखेड येथील मोबाईलच्या बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपिंना धारुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, उप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पी.आय. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल धस, भस्कर केंद्रे, कल्याण तांदळे, राजू वंजारे यांनी केली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review