धारूरमधील खुनाचा झाला उलगडा,बाप-लेकाच्या भांडणात डोकं फुटलं, बापाचा झाला होता  मृत्यू

धारूरमधील अशोक नगर 
येथील खुनाचा झाला उलगडा
बाप-लेकाच्या भांडणात डोकं फुटलं, बापाचा झाला होता  मृत्यू
धारूर (रिपोर्टर):- धारूर शहरातील अशोनगर येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुलानेच बापाचा खून करून पोलिसांना खोटी माहिती दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मुलानेच पैशासाठी स्वत:च्या बापाचा खून केल्याचे उघड झाले तेव्हा त्याला काल रात्री पोलिसांनी अटक केले. 
    आश्रुबा कारभारी मुंडे (वय ७४, रा. अशोकनगर, धारूर) यांना अनुदानाचे दहा हजार रुपये आले होते व त्यांचा मुलगा बलभीम आश्रुबा मुंडे हा त्यांच्याकडे अनुदानाच्या पैशाची वेळोवेळी मागणी करत होता. हे दोघेही दारुडे असल्याने एक दुसर्‍याला पैसे देत नव्हते. शेवटी त्या मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात जबर जखम करून खून केला आणि पोलिसांना खोटी माहिती दिली की त्याच्या वडिलाचा मृत्यू हा पायरी चढत असताना झाला. त्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये अशा प्रकारची ईडी दाखल झाली होती. त्यानंतर एपीआय जाधव यांनी तपास सुरुच ठेवला. त्यामध्ये दि. २१ जानेवारी २०१९ रोजी घडलेली ही घटना काल दि. १२ मार्च रोजी पोलिसांना निष्पन्न झाले की आश्रुबाचा खून त्याचा मुलगा बलभीम मुंडे यानेच केला. तेव्हा त्यास पोलिसांनी रात्री अटक केली. अटक करून त्याच्यावर गु.र.नं. ५७/२०१९ नुसार कलम ३०२ दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review