ताज्या बातम्या

पाचेगावात ट्रिपल बर्निंग

पाचेगावात ट्रिपल बर्निंग

सुनेने जाळून घेतल्यानंतर सासुनेही पेटून घेतले,
आग विझविण्यासाठी गेलेला सासराही भाजला
बीड (रिपोर्टर) :-घरगुती कारनावरुन सासु सुनेत झालेल्या भाडनानंतर सुनेने अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला जाळून घेतले. गंभीर भाजलेल्या सुनेला दवाखाण्यात घेवून गेल्यानंतर लगेच सासुनेही पेटून घेतले, तिला वाचविण्यासाठी सासर्‍याने प्रयत्न केला असता यामध्ये ते देखील भाजले असून तिघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज सकाळी ८ वाजता गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील जयश्री खंडू शेळके (वय २२ वर्षे) या विवाहीतेचे आज सकाळी सासु मुक्ताबाई शेळके (वय ६० वर्षे) यांच्यासोबत भांडणे झाले. याचा राग मनात धरुन सुन जयश्री हीने रॉकेल अंगावर ओतून घेत स्वत:ला जाळून घेतले. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असतांना लगेच सासू मुक्ताबाई यांनी देखील पेटून घेतले. त्यांना वाचविण्यासाठी सासरा आत्माराम शेळके यांनी प्रयत्न केला असता यामध्ये ते देखील भाजले आहेत. तिघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून सुन ९० टक्के सासू ४० टक्के तर सासरा २० टक्के भाजला आहे.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review