ताज्या बातम्या

जिल्ह्याचा विकास हवा की जिल्हा भकास हवा भूमिका मी मांडली आता मतदानरूपी पाठबळ तूम्ही द्या -आ.क्षीरसागर

जिल्ह्याचा विकास हवा की जिल्हा भकास हवा
भूमिका मी मांडली आता मतदानरूपी पाठबळ तूम्ही द्या -आ.क्षीरसागर
बीड (रिपोर्टर): ३० वर्षाच्या राजकारणात जिथे मान सन्मान मिळेल तिथे तसे काम केले. जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलो परंतू म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जनतेसाठी जेंव्हा आपण एखादी भूमिका मांडतो तेंव्हा सरकार दरबारी त्याचा विचार व्हायला हवा परंतू तसे झालेच नाही. सापत्न पणाची वागणूक आणि पक्षाकडून होणारी हेळसांड आपल्याला भूमिका बदलण्यास भाग पाडली. सबका साथ सबका विकास हा विचार घेऊन युती सरकारने विरोधी पक्षाचा असतानाही माझ्या प्रत्येक मागणीला सकारात्मकता दाखवली आणि बीड शहरासाठी मतदारसंघासाठी अपेक्षेपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला. ही बाब माझ्या मतदार बांधवांसाठी गरजेची ठरली त्यामुळेच आपण आपली भूमिका बदलून महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिला. जिल्ह्याचा विकास हवा की जिल्हा भकास हवा याचा विचार करणे आता गरजेचे आहे. मी माझी भूमिका मांडली आहे आता मतदानरूपी पाठबळ तुम्ही द्या असे कळकळीचे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
गेल्या ८ दिवसांपासून आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर बीड मतदारसंघात आ.जयदत्त क्षीरसागर यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ झंजावाती दौरा सुरू केला. एका-एका दिवशी ८ - ८ सभा आणि कॉर्नर बैठका सुरू झाल्या. भाजपाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांना बरोबर घेत आपल्या सवंगड्यांसह त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. एवढेच नव्हे तर शहरातील विविध सामाजिक संघटना पेंटर संघटना, खासगी वस्तीगृह चालक, कोचींग क्लासेस चालक, छावणी धारक, विविध शिक्षक संघटना यांनी निमंत्रित करून त्यांच्याशी प्रत्यक्षात संवाद साधला. महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांना मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी आपल्या भूमिकेला मतदानरूपी पाठबळ देण्याचे आवाहनही केले. आ.जयदत्त क्षीरसागरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आण्णांच्या शब्दाचा मान राखला. डॉ.प्रितम मुंडे यांना विजयी करण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकार्‌यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे डॉ.मुंडे यांचा विजय आता कोणीही रोखू शकणार नाही

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review