ताज्या बातम्या

बाजार समितीच्या विरोधात निबंधक कार्यालयासमोर आंदोलन

बाजार समितीच्या विरोधात निबंधक कार्यालयासमोर आंदोलन
बीड (रिपोर्टर):- धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मचार्‍यांकडून काम करून घेतले. मात्र त्यांना योग्य मोबदला अद्यापही मिळाला नसल्याने सदरील कामगार बीड येथील उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर येथे कापूस खरेदी केंद्रावर मापाडी म्हणून अनेक कामगारांनी काम केले. या कामाचा योग्य ते मोबदला बाजार समितीने द्यायला हवा होता मात्र तो दिला नसल्याने आपल्या मोबदल्यासाठी कामगार बीड येथील उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यामध्ये चिंतामन सोळंके, हरिभाऊ गवळी, कल्याण सोळंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review