बेलगुडवाडी परिसरात आढळला वाघसदृश प्राणी ; नागरिकांत भीती

गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक वाघसदृश प्राणी आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हा प्राणी तडस असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.
तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील काही शेतकर्‍यांना हा प्राणी आढळून आला होता. याबाबत परिसरात चर्चा सुरू असतानाच पुन्हा काल रात्रीच्या दरम्यान काही तरुणांना गावच्या बाजूला असलेल्या कापशी नदी येथे हा प्राणी आढळुन आल्याने परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क करून त्याच्या पायाच्या ठशाचे फोटो दाखवले असता हा तडस प्राणी असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले असून नागरिकांनी सावध रहावे मात्र घाबरून जाऊ नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने देविदास गाडेकर यांनी केले आहे

अधिक माहिती: beed

Best Reader's Review