तीन दिवसांच्या सुटीनंतरही केजचे गटसाधन केंद्र आज उघडलेच नाही

केज (रिपोर्टर):- शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी होती. आज शनिवार असल्याने ऑफीशीयल दिवस असूनही दुपारी बारा वाजेपर्यंत केजचे गटसाधन केेंद्र कार्यालय उघडले नसल्याने कार्यालयाचा कसा अनागोंदी कारभार चालतो हे दिसून आले. सदरील कार्यालयाचे कर्मचारी नेहमी आपल्या कामात कुचराईपणा करून दांड्या मारत आहेत. तरी देखील याची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नसल्याचे दिसून येते.
दि. १७, १८ व १९ असे सलग तीन दिवस सुट्‌ट्या होत्या. बहुतांशी कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली होती. सलग तीन दिवस सुट्टी असताना आज शनिवार असून कार्यालयीन दिवस आहे. आज सर्वत्र कार्यालय सुरू असताना केजचे गटसाधन केंद्र कार्यालय दुपारपर्यंत उघडलेलेच नव्हते. कामानिमित्त काही महिला या कार्यालयात आल्या होत्या मात्र कार्यालय उघडे नसल्याने काही वेळ महिला थांबून परत गेल्या. एरव्हीही कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आपल्या कामात कुचराईपणा करून कार्यालयाला दांड्या मारत असतात. केज तालुक्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय कार्यालयाकडे लक्ष नसल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे

अधिक माहिती: beed

Best Reader's Review