प्रितम रेसिडेन्सीच्या गेटचे लॉक अज्ञाताने तोडले

प्रितम रेसिडेन्सीच्या गेटचे लॉक अज्ञाताने तोडले

बीड (रिपोर्टर) : शहरातील प्रितम रेसिडेन्सीच्या मेन गेटचे कुलूप अज्ञाताने रविवारच्या रात्री तोडले. त्यानंतर सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसा घटनास्थळी भेट दिली. मात्र तेथे कसल्याही प्रकारची चोरी झाली नसून एका दुचाकीची आदला बदल झाली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील उन्हाळे  हॉस्पिटल नेत्रधान परिसरातील प्रितम रेसिडेन्सी मध्ये रविवारी रात्री अज्ञातानेे मेन गेटचे कुलूप तोडले. मात्र कोणत्याही घरी चोरी झाली नाही. तेथे उभी असलेली प्रशांत सुलाखे यांची दुचाकी क्र. एम.एच. २३. व्ही. १६८९ बायब असून तेथे एक बेवारस दुचाकी आढळून आली. हे कुलूप नेमके कोणी तोडले. ती बेवारस दुचाकी कोणाची याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पीएसआय जाधव, महेश जोगदंड, असलम पठाण, गरजे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अधिक माहिती: beed reporete

Best Reader's Review