शेताकडे जाणारा रस्ता अडवला

शेताकडे जाणारा रस्ता अडवला
जिल्हाधिकार्‍यांनी रस्ता द्यावा नसता उपोषण
बीड (रिपोर्टर):- शेताकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डा खोदून सदरील रस्ता अडवल्याचा प्रकार बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथे घडला. या बाबत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नसता कुटुंबासमवेत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
रोहिदास कुंडलिक पैठणे यांच्या नंबर बांधावरून रस्ता होता. मात्र या रस्त्यावर पैठणे यांनी जेसीबीने खड्डा खोदीन रस्ता बंद केला. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी रामचंद्र लोणकर, सुधीर लोणकर, पांडुरंग पैठणे, मुरलीधर पैठणे, शेषेराव पैठणे यांच्यासह आदी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान रस्ता उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍याने दिला आहे

अधिक माहिती: beed

Best Reader's Review