शिवाजीनगरमधून युवक बेपत्ता 

शिवाजीनगरमधून युवक बेपत्ता 
बीड (रिपोर्टर):- शिवाजीनगर या भागामध्ये राहणारा इयत्ता १२ वीत शिकणारा युवक काल दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता झाला असून त्याची शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. 
  मनोज मुरलीधर राऊत (रा. पाली ता. जि. बीड) हा विद्यार्थी इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. तो शिवाजीनगर भागामध्ये काही विद्यार्थ्यांसोबत रुम करून राहत होता. मात्र काल दुपारी तीन वाजल्यापासून तो घरातून बेपत्ता झाला. त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोधाशोध घेतला मात्र तो कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर त्याची शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये हरवल्यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे. मनोजच्या अंगावर भगव्या रंगाचा शर्ट असून आढळल्यास मोबाईल क्र. ९८६०३१७३१८ वर संपर्क साधावा. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review