जालना, औरंगाबादसह राज्यातल्या चौदा मतदारसंघात उद्या मतदान

जालना, औरंगाबादसह राज्यातल्या चौदा मतदारसंघात उद्या मतदान
दानवे, खैरे, बापट, शेट्टी, सुप्रिया सुळे, खडसेंचं भवितव्य उद्या मतपेटीत बंद
औरंगाबाद/बीड (रिपोर्टर):- लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी उद्या मराठवाड्यातील दोन तर महाराष्ट्रातील १४ मतदारसंघात मतदान होत असून रावसाहेब दानवे, सुनिल तटकरे, गिरीष बापट, राजू शेट्टी, खा. सुप्रिया सुळे, रक्षा खडसे, सुजय पाटील, चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मातब्बर या निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रचाराच्या तोफा काल थंडावल्यानंतर आज राज्यभरात मी मी म्हणणारे मातब्बर मतदारांनी आपल्यालाच कौल द्यावा, यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करीत आहेत. 
  लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना या मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना मतदारसंघातून उभे असून त्यांना कॉंग्रेसचे उमेदवार विलास औताडे हे आव्हान देत आहेत तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना आव्हान देण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे जिक्रीने लढत आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाकडे मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. यापाठोपाठ राज्यातील जळगाव, रावेर, रायगड, पुणे, सांगली, बारामती, महाडा, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघातही उद्या मतदान होत असून यातील बहुतांशी मतदारसंघात शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी या पक्षातील मातब्बर आपलं भवितव्य आजमावत आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review