हृदयविकाराच्या झटक्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू 

हृदयविकाराच्या झटक्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू 
बीड (रिपोर्टर):- वाघेबाभुळगाव येथील एका २८ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने काल मृत्यू झाल्याची घटना घडली. 
  अशोक मारुती भोजने (रा. वाघेबाभुळगाव) हे मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. काल वाघेबाभुळगाव येथील जत्रेनिमित्त ते गावी आले होते. जत्रेत गेले असता तेथे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी काल जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला होता. तरुणाच्या या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review