मुलीच्या लग्नाचं कर्ज झालं बोरखेडमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या

मुलीच्या लग्नाचं कर्ज झालं बोरखेडमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या

नेकनूर / चौसाळा (रिपोर्टर)ः-दुष्काळाची तिव्रता भीषण असून या दुष्काळात शेतकरी होळपळून निघत आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. नेकनूरजवळ असलेल्या बोरखेड येथील एका शेतकर्‍यांने आज सकाळी गळफास लावून आपले जिवन संपवले. काही महिन्यापूर्वी सदरील शेतकर्‍याच्या मुलीचे लग्न झाले होते. या मुलीचे लग्नाचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्याने आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे बीड जिचल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरुच असून चालू वर्षातल्या तीन महिने आणि २२ दिवसात ५२ पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसरीकडे शासन-प्रशासन व्यवस्था शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले असून लोकप्रतिनिधी तर या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत अहे. 
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍यांची आर्थीक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. सततचा दुष्काळ आणी नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येची संख्या वाढू लागली. गेल्या तिन महिन्याच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील ५० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. नेकनूर पासून जवळ असलेल्या बोरखेड येथील सदाशिव सुखदेव लंबाटे वय- ४५ वर्षे या शेतकर्‍यांने गेल्या काही महिन्यापूर्वी आपल्या एका मुलीचे लग्न केले.या लग्नाचे कर्ज त्याच्या डोक्यावर होते. भविष्यात हे कर्ज कसे फेडायचे आणी अन्य दोन मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेत लंबाटे असायचे. आज सकाळी त्यांनी शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती गावातील नागरीकंाना झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी धाव घेतली होती. नेकनूर पोलीसांना माहिती कळाल्यानंतर ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पंचनामा करून मयत शेतकर्‍याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास जमादार गौतम वाघमारे हे करत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी भिषण दुष्काळ पडला असून या दुष्काळाची दाहकता तिव्र आहे.महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार कुठलीही ठोक पाऊले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणामुळे शेतकरी आपले जिवन संपवत आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review