आनंदगावच्या ग्रा.पं.वर १७ मे रोजी पाणीबाणी मोर्चा गावाला धरणातून पाणीपुरवठा करा -थावरे 

आनंदगावच्या ग्रा.पं.वर १७ मे रोजी पाणीबाणी मोर्चा
गावाला धरणातून पाणीपुरवठा करा -थावरे 
जिल्हा परिषदेच्या योजना कोरड्या पडल्या 
माजलगाव (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला, गावागावांत पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ लागलेत. तालुक्णयातील आनंदगाव येथेही पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून जिल्हा परिषदेने आजपर्यंत ज्या काही योजना राबवल्या त्या सगळ्या योजना कोरड्या पडल्या असून आता प्रशासनाने माजलगावच्या धरणातून गावाला पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी १७ मे रोजी ग्रा.पं. कार्यालयावर पाणीबाणी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे. 
  बीहड जिल्ह्यात सातशेपेक्षा जास्त टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार उडाला असून विहिरी, बोअर आटल्याने काही ठराविक तलावातून टँकरने भरून गावकर्‍यांना पाणीपुरवठा केला जात आहे. आनंदगाव येथे जि.प.च्या वतीने तीन विहिरी खोदल्या. पाणीपुरवठ्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्या. आज या सर्व योजना कोरड्या पडल्या आहेत. गावकर्‍यांचे पाण्यासाठी हाल होत असून पात्रूडपर्यंत माजलगाव धरणाचे पाणी आलेले आहे. तेथून आनंदगावपर्यंत पाईपलाईन करून गावकर्‍यांना पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी १७ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर पाणीबाणी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २० मे रोजी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review