जिल्ह्यातल्या दहा हजार शेतकर्‍यांना ऑफलाईन विमा मंजूर

जिल्ह्यातल्या दहा हजार शेतकर्‍यांना ऑफलाईन विमा मंजूर
बीड (रिपोर्टर):- २०१७ साली खरीप हंगाम पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्‍यांना राज्य सरकारने एक दिवसाची मुदतवाढ देऊन ऑफलाईन अर्ज स्वीकारले होते. एका दिवसात बीड जिल्ह्यातून १० हजार ४९२ अर्ज आले होते. दोन वर्षांंनंतर या शेतकर्‍यांना विमा मंजूर झाला. १० हजार शेतकर्‍यांसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले असून हे विम्याचे पैसे संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाले. ऐन दुष्काळात शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला अहे. 
  खरीप हंगाम २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बिगर कर्जदार शेतकर्‍यांना विमा उतरवण्यासाठी ३१ -२-२०१७ ची शेवटची मुदत देण्यात आली होती. इंटरनेटच्या अडचणीमुळे ही मुदत वाढवून ४ ऑगस्ट २०१७ करण्यात आली होती. मात्र या मुदतीनंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने एक दिवसाची म्हणजेच ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीमध्ये बीड जिल्ह्यातील १० हजार ४९२ शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता. दोन वर्षानंतर राज्यातील शेतकर्‍यांना या पीक विम्याचा लाभ मिळाला. एकूण ६३ कोटी रुपये मंजूर झाले. बीड जिल्ह्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. ही विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली असून भीषण दुष्काळात १० हजार शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळाल्याने संबंधित शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review