वांगीत दोन गटात हाणामार्‍या

वांगीत दोन गटात हाणामार्‍या
सातपेक्षा जास्त जखमी 
बीड (रिपोर्टर):- ‘तुम्ही लावलेली झाडे आमच्या शेतात येत असल्याचे कारण पुढे करत दोन गटांमध्ये आज सकाळी वादावादी झाली. याचे पर्यावसन तुंबळ हाणामार्‍यात झाले असून दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठ्या - काठ्याने हल्ला चढवत दगडफेक केली. यात दोन्ही गटांचे सातपेक्षा जास्त जण जखमी झाले असून जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
   पांडुरंग खडके यांनी आपल्या शेतामध्ये झाडे लावलेली आहेत. ही झाडे आमच्या हद्दीत येत असल्याचा आक्षेप गजानन शेळके यांनी घेतला. यावरून दोन गटांमध्ये आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान शाब्दीक बाचाबाची झाली. याचे पर्यावसन तुंबळ हाणामार्‍यात झाले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्याने हल्ला चढवून दगडफेक केली. यात पांडुरंग खडके, अंजना खडके, नवनाथ खडके, प्रेरणा खडके, गजानन शेळके, त्रिंबक शेळके, चंद्रकला शेळके (सर्व रा. वांगी) यासह सातपेक्षा जास्त लोक जखमी झाले. या जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review