एक हजाराची लाच घेताना हिंगणगावचा तलाठी पकडला

एक हजाराची लाच घेताना हिंगणगावचा तलाठी पकडला
गेवराई (रिपोर्टर):- फेरफार ओढण्यासाठी गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील तलाठ्याने पैशाची मागणी केली होती. आज तलाठी सज्जा कार्यालयावर एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले. 
तालुक्यातील हिंगणगाव येथील तलाठी सज्जा कार्यालय गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीमध्ये आहे. तलाठी काकडे यांनी एका शेतकर्‍याकडे फेरफारसाठी पैशाची मागणी केली होती. तडजोडअंती आज एक हजार रुपये देण्याचे ठरले होते. संबंधिताने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान एक हजार रुपये स्वीकारताना तलाठी काकडे यास लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलूचपत विभागाचे गजानन वाघसह त्यांच्य टीमने केली. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review