मुंबई, पुण्यात तोडले वाहतूकीचे नियम बीडमध्ये भरले दंड

मुंबई, पुण्यात तोडले वाहतूकीचे नियम बीडमध्ये भरले दंड
बीड वाहतूक शाखा झाली ऑनलाईन, २१ दिवसात तीन लाखाचा दंड वसूल
गणेश जाधव- बीड

मुंबई, पुण्यात शायनिंग मारताय... येथे पोलिसांना गुंगारा देत वाहतुकिचे नियम मोडताय...  सिग्नल तोडून गाडी पुढे नेताय... अन् पोलिसांनी दंड केला नाही म्हणून खुश होताय... तर तो तुमचा गोड गैर समज आहे. कारण बीडची वाहतूक शाखा आता ऑनलाईन झाली असून तुम्ही मुंबई, पुण्यात काय दिवे लावले हे त्यांना इचलणच्या मशिनव्दारे तत्काळ कळत असल्याने बीड वाहतूक शाखेने आतापर्यंत मोठा दंड वसूल केला आहे. जो दंड भरणार नाही त्यांची गाडी जप्त करण्याचे आदेशच पोलिसांना दिले असल्याने नियम मोडणारे वाहनचालक निशब्द होत दंड भरत आहेत. २२ एप्रिल २०१९ पासून बीड वाहतूक शाखा ऑनलाईन झाली असून आतापर्यंत १३६९ ऑनलाईन केसेस करण्यात आल्या आहेत. तर एकूण २९६२०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. त्यापैकी ६८८०० रुपयाचा दंड पुणे, मुंबईत वाहतूकीचे नियम मोडणारांकडून बीडमध्ये वसूल करण्यात आला आहे.
    बीड वाहतूक शाखा यापूर्वीही ऑनलाईन झाली होती. मात्र काही तांत्रीक अडचणीमुळे पुन्हा कर्मचार्‍यांना पावती बुक हातात घ्यावे लागले होते. त्यामुळे इतर शहरात वाहतूकीचे नियम तोडणारांकडून दंड वसूल करता येव नव्हता. शिवाय प्रत्येकांकके पावती बुक नसल्याने वसूल केलेला दंड स्वत:च्या खिशात की शासनाच्या तिजोरीत जात होता हे कारवाईची आकडेवारी सांगत आहे. मात्र गेल्या २२ एप्रिल पासून वाहतूक शाखा ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येकांकडे कॅमेरा .... देण्यात आले आहे. त्यामुळे गाडी पकडल्यास त्या गाडीचा नंबरवरुन पेंडिग चलन आहे का? हे तपासले जाते. जर पेडिंग चल असेल तर त्याला ते चलन भरने बंदनकारक करण्यात आले आहे. ते न भरल्यास त्याला कोर्टामार्फत नोटीस दिली जात आहे. बीड जिल्हा वाहतूक शाखेने २१ दिवसात ६८ हजार ८०० रुपयाचा दुसर्‍या शहरात वाहतूकीचे नियम मोडणारांकडून तर २ ला २७ हजार ४०० रुपये बीड जिल्ह्यात वाहतूकीचे नियम मोडणारांकडून वसूल केले आहेत. ही मशिन हाताळण्यासाठी सोपी असून वाहतुकिचे नियम मोडणारांची सर्व कुंडलीच सांगत आहे.

बीडमध्येही नियम तोडणार्‍या वाहन चालकांकडून वाहतूक शाखा दंड वसूल करते. वाहनधारकाने पैसे नसल्याचे कारण पुढे केले तर त्यांनाही पेंडिंग ई चलन दिले जाणार आहे. 
-विजय कबाडे
अप्पर पोलिस अधिक्षक, बीड. 

काय सांगते चार महिण्यातील ऑफलाईनची आकडेवारी
१ जानेवारी ते २१ एप्रिल दरम्यान वाहतूक शाखा ऑफलाईन होती. त्यामध्ये बीड जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून १०,४६८ केसेस करण्यात आल्या असून २८,७४,४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
जिल्हा वाहतूक शाखेत एकूण ३८ पोलिस कर्मचारी आहेत. त्यापैकी २८ पोलिस कर्मचार्‍यांना इचलन मशिन कशी हाताळण्याची याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर दहा कर्मचारी निवडणुकिच्या कामात इतर जिल्ह्यात होते. त्यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review