ताज्या बातम्या

तुकोचीवाडी येथे महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

महिलेचा विनयभंग तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर):- तुकोचीवाडी येथे एका महिलेला तलावावर मासे पकडत असतांना तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी तिघांंवर विनयभंगासह ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला तलावावर मासे पकडत असतांना त्या ठिकाणी आरोपी विनायक चौरे, चंदु चौरे व अन्य त्याचा एक भाऊ अशा तिघांनी मिळून त्या ठिकाणी जावून महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली. आणि तिला वाईट हेतूने छातीवर दगडाने मारहाण केली व जबर मार दिला. आणि तिचा विनयभंग केला. हे प्रकरण पाहत असतांना पती सोडवण्यास गेला असता त्याला ही दगडाने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा या तलावावर आले तर तुम्हाला मारून टाकू असे म्हणत त्यांचे मासे पकडण्याचे जाळे तोडून टाकले आणि त्यांचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.२५०/२०१९ नुसार ३५४, ३५४ अ, ३२३, ५०४, ४२७, ३४ भांदविसह कलम ३,१, (आर) (एस) (डब्ल्यु) (२) अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार ऍट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विभागीय पोलीस अधिक्षक आम्ले हे करत आहेत

अधिक माहिती: beed

Best Reader's Review